हिंदु धर्मात स्त्रियांना दुय्यम स्थान असते या साम्यवाद्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका ! – अधिवक्त्या मृणाल साखरे

पिंपळखुटे (पुणे) येथे युवक आणि महिलांचा हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पिंपळखुटे (पुणे) येथील सभेत मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले

पिंपळखुटे (जिल्हा पुणे), ५ डिसेंबर (वार्ता ) – भारतीय परंपरेत स्त्रियांना सदैव मानाचे स्थान होते. गार्गी मैत्रयी यांसारख्या स्त्रिया वेद शास्त्र पारंगत होत्या, तर राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ यांच्यासारख्या स्त्रिया या राजकारणात पारंगत होत्या. स्त्रियांना केवळ मागील १०० वर्षांपासूनच शिक्षणाची संधी उपलब्ध झाली, असा खोटा अपप्रचार साम्यवाद्यांकडून केला जात आहे. सद्यःस्थितीत स्त्रिया धर्माचरणापासून दूर जात असल्याने त्या लव्ह जिहादला बळी पडत आहेत, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या अधिवक्त्या मृणाल साखरे यांनी केले. पिंपळखुंटे (तालुका मावळ) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पटांगणात २७ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेला १५० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती.

हिंदूंवर होणारे विविध आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र निर्माण करण्यास सिद्ध व्हा, असे आवाहन या वेळी श्री. पराग गोखले यांनी केले.

विशेष

१. सभा झाल्यावर काही धर्मप्रेमींनी धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली.

२. सभा झाल्यानंतर धर्मप्रेमींनी वक्त्यांसमवेत धर्मावरील आघात, धर्मकार्य तसेच स्थानिक समस्या यांविषयी चर्चा केली.