आंध्रप्रदेशातील वाहतूक पोलिसांच्या पावतीवर येशू ख्रिस्ताचे चित्र आणि बायबलमधील वाक्य !

सामाजिक माध्यमांतून टीका झाल्यावर पोलिसांचे स्पष्टीकरण

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी

अमरावती (आंध्रप्रदेश) – सामाजिक माध्यमांतून एका पावतीचे छायाचित्र प्रसारित होत आहे. ही पावती विशाखापट्टनम्च्या वाहतूक पोलिसांची आहे. या पावतीवर येशू ख्रिस्ताचे चित्र आणि बायबलमधील एक वाक्य लिहिण्यात आले आहे. तेलुगू देसम् पक्षाचे नेते अमन वेंकट रमना रेड्डी यांनी हे देयक ट्वीट केले आहे. या पावतीमध्ये एका व्यक्तीकडून ८० रुपये शुल्क घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

१ . सामाजिक माध्यमांतून यावर टीका होऊ लागल्यानंतर विशाखापट्टणम् वाहतूक पोलिसांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे की, एका रिक्शाचालकाकडून पोलीस हवालदाराला अशा प्रकारच्या पावत्या देण्यात आल्या होत्या. दुर्दैवाने आणीबाणीच्या काळात त्याने याचा वापर करून चूक केली आहे तिचा वापर केला. याची माहिती मिळाल्यानंतर या पावत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या पावत्यांचा वापर जाणीवपूर्वक करण्यात आलेला नाही.

२. पोलिसांच्या या स्पष्टीकरणानंतरही सामाजिक माध्यमांतून टीका होतच आहे. ‘दमचेरला हरि बाबू’ नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने यावर म्हटले आहे की, ही एक चांगली कथा आहे. चित्रपट दिग्दर्शक राजमौली यांनी ती दिली पाहिजे. आंधप्रदेश पोलिसांना लाज वाटली पाहिजे. ज्या कुणी हे केले आहे त्याने त्यागपत्र देऊन चर्चच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री ख्रिस्ती असल्याने असे प्रकार घडत आहेत, असे कुणी म्हटल्यास चुकीचे काय ?
  • हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे याविषयी कधीच काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !