(म्हणे) ‘श्रद्धाचे ३५ च काय, तर ३६ तुकडेही करता आले असते !’

  • आफताब पूनावाला याचे उत्तरप्रदेशातील राशिद खान या युवकाकडून समर्थन

  • आफताबचे कृत्य योग्य असल्याचे विधान

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – श्रद्धा वालकर या हिंदु युवतीची अमानवीय हत्या करणार्‍या आफताब पूनावाला याचे भारतातील अनेक धर्मांध मुसलमानांकडून समर्थन केले जात आहे. अशातच येथील युवक राशिद खान याचा एका महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. यामध्ये खान म्हणत आहे की, माणसाला राग आला, तर तो ३५ च काय, तर ३६ तुकडेसुद्धा करतो. माझासुद्धा कुणाशी अशा प्रकारे वाद झाला, तर मीही असेच करीन.

१. संबंधित महिला पत्रकाराने खान याला विचारले की, यासाठी त्यांना कुठे प्रशिक्षण मिळते का ? त्यावर तो म्हणतो की, यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता काय ? चाकू घ्या आणि चालवायला आरंभ करा !

२. मला असे करण्याचा अनुभवही आहे. जर माझे कुणाशी युद्ध झाले, तर मी त्यास गाडून टाकीन, असेही तो या व्हिडिओमध्ये म्हणतांना दिसत आहे.

३. आफताबचे समर्थन करतांना तो म्हणत आहे की, दोघांची चूक झाली असेल, एक गेली, दुसराही चालला जाईल.

४. खानचा हा व्हिडिओ समोर आल्यावर हिंदू त्याच्या अटकेची मागणी करत आहेत.

संपादकीय भूमिका

देशातील धर्मांध मुसलमानांची मानसिकता लक्षात येण्यासाठीचे हे आणखी एक उदाहरण ! यासाठीच आता धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक !