धुळे – मुंबईतील हिंदु तरुणी श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असतांना उत्तरप्रदेशातील लखनौ येथेही १९ वर्षीय निधी गुप्ता या तरुणीने धर्मांतरास नकार दिल्यावर सूफीयान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केली. अशी अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. असे अनेक ‘आफताब’ आणि ‘सूफियान’ उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत. या वासनांध, क्रूर आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद अर्थात् ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी धुळे येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली.
या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन पक्ष, स्वदेशी जागरण मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रशेखर आझादनगर शिवजयंती उत्सव समिती, राजेश्वर मित्र मंडळ, आद्य श्री शिवछत्रपती गोरक्ष जनआंदोलन, प्रहार अपंग क्रांती संस्था, इंदिरा महिला मंडळ धुळे, श्रीराम सेना नरव्हाळ, प्रभातनगर सांस्कृतिक मित्र मंडळ, देवपूर, धुळे आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला. ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणीही येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली.
नाशिक येथे निवेदन !
नाशिक येथेही वरीलप्रमाणे मागणी हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे अपर जिल्हाधिकारी दराडे यांच्याकडे केली आहे. या वेळी भाऊसाहेब डांगे पाटील, हिंदु जनजागृती समितीचे गौरव जमधडे, स्वराज्य संघटनेचे शाखाप्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण, तसेच श्रद्धाताई चव्हाण, तुषार डांगे, यश चव्हाण आदी धर्माभिमानी उपस्थित होते.