‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोघा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयीन कार्यक्रमात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनी यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली, तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतातील अशा पाकप्रेमींना आता कठोर शिक्षा करणारा कायदा करणेच आवश्यक !