
पुणे – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले सुप्रसिद्ध श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. वर्ष २०२७ मधील नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा आणि ‘प्रयागराज महाकुंभ २०२५’चा अनुभव लक्षात घेता, भीमाशंकर येथे भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. या वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्टने नवीन सभामंडप आणि पायरी मार्गाचे काम हाती घेतले होते. त्यासाठी ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. हे काम अवघ्या ५ महिन्यांत पूर्णत्वास आले आहे. मुख्य सभामंडप, दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता आणि गर्दी व्यवस्थापनाची आवश्यक पायाभूत कामे अंतिम टप्प्यात असून बांधकाम साहित्य हटवून परिसर भाविकांसाठी मोकळा करण्यात आला आहे.
ऑनलाईन नोंदणी नसल्याने शेकडो भाविक दर्शनविना माघारी
मंदिर ५ महिन्यांनंतर उघडल्यामुळे पहिल्याच दिवशी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला; मात्र ऑनलाईन नोंदणी नसलेले शेकडो भाविक पवित्र शिवलिंगाचे दर्शन न घेताच माघारी फिरले. यामध्ये काही राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांचाही समावेश होता. त्यामुळे संभाव्य गर्दी आणि पारदर्शकता लक्षात घेता, भाविकांनी वैध ओळखपत्रासह प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट अन् पोलिसांनी केले आहे.
भाविकांसाठी मार्गदर्शक नियम आणि ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
भीमाशंकर मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने १५ ते ३० जून २०२६ या कालावधीत प्रतिदिन सकाळी ७ ते ११ या वेळेतच दर्शन सुविधा उपलब्ध राहील. मंदिरात केवळ पासधारक अशा प्रतिदिन १ सहस्र भाविकांनाच प्रवेश दिला जाणार असून नोंदणीकृत भाविकांची सूची अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. दर्शनासाठी भाविकांनी https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन भ्रमणभाष किंवा ई-मेलद्वारे नोंदणी करावी आणि दिनांक-वेळ निवडून ‘नोंदणी पावती’ (पास) ‘डाऊनलोड’ करावी. दर्शनाला येतांना वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !
ग्रामीण पातळीपर्यंत दर्जेदार इंटरनेटसाठी ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन !