वर्ष २००८ मध्ये स्वतःची जन्मनोंदणी आणि वर्ष २००९ मध्ये विवाहाची नोंदणी पोर्तुगालमधील लिस्बन येथे केली !
माहिती अधिकार कार्यकर्त्याने तक्रार करूनही पोलीस खात्याचे दुर्लक्ष !
पोर्तुगीज नागरिकत्व मिळवल्याच्या आरोपावरून सरकारची कारवाई

पणजी, १६ जून (वार्ता.) – गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाचे अधीक्षक एडवीन कुलासो यांना पोर्तुगीज नागरिकत्व आणि पारपत्र मिळवल्याच्या आरोपावरून कारवाई करून सरकारने तातडीने निलंबित केले आहे. दक्षता खात्याचे संचालक अमरसेन राणे यांनी १५ जून या दिवशी याविषयी अधिकृत आदेश प्रसारित केला आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार एडवीन कुलासो यांनी वर्ष २००८ मध्ये स्वतःची जन्मनोंदणी आणि त्यानंतर वर्ष २००९ मध्ये स्वत:च्या विवाहाची नोंदणी पोर्तुगालमधील लिस्बन येथे केल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. (त्यांची आतंकवादविरोधी पथकाचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करतांना ही माहिती खात्याला का नव्हती ? – संपादक) त्याचप्रमाणे त्यांच्याकडे पोर्तुगीज पारपत्र असल्याचेही उघडकीस आले आहे.
माहिती अधिकार क्षेत्रातील एका कार्यकर्त्याने राज्यातील काही पोलीस अधिकार्यांविरुद्ध पोर्तुगीज जन्मदाखल्याशी संबंधित तक्रार पोलिसांकडे प्रविष्ट (दाखल) केली होती. यामध्ये एडवीन कुलासो यांचाही समावेश होता. प्रारंभी कुलासो यांच्याविरुद्धच्या या तक्रारीविषयी काही कारवाई झाली नाही. (खरेतर कुलासो यांनी तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर स्वतः पारदर्शकपणे ही माहिती पोलीस खात्याला देणे अपेक्षित होते ! – संपादक) त्यानंतर तक्रारदाराने या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.
उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर याचे अन्वेषण चालू करण्यात आले आणि नंतर हे प्रकरण दक्षता खात्याकडे सोपवण्यात आले. दक्षता खात्याने या प्रकरणाचे सखोल अन्वेषण केल्यानंतर अधीक्षक कुलासो यांच्या विरोधातील आरोपांमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. अन्वेषणामध्ये त्यांच्या जन्माची आणि विवाहाची नोंदणी पोर्तुगालमध्ये केल्याचे सिद्ध झाल्याने सरकारने ही कारवाई केली आहे. (अशी व्यक्ती भारताशी कितपत निष्ठा बाळगणारी असेल ? आतंकवादविरोधी पथकासारख्या संवेदनशील पथकात त्यांची नियुक्ती करणे आणि तक्रार केल्यावर चौकशीही न करणे, यातून पोलीस खात्याची असंवेदनशीलताच दिसून येते ! – संपादक)
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
मोशी येथील कचरा आगार दुर्घटनेच्या संदर्भात आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !