तुर्कीयेत ६६ वर्षीय इस्लामी उपदेशकाला ८ सहस्र ६५८ वर्षांची शिक्षा !

  • उपदेशकाला आहेत १ सहस्र प्रेयसी !

  • अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार !

  • आढळल्या ६९ सहस्र गर्भनिरोधक गोळ्या !

  • खासगी वाहिनीद्वारे पसरवत होता कट्टरता !

इस्तंबूल (तुर्कीये) – आतंकवादी संघटना चालवणे, बलात्कार, धमकावणे, तसेच आर्थिक हेराफेरी आणि हेरगिरी केल्याच्या प्रकरणांत इस्लामी उपदेशक अदनान ओकतार याला येथील न्यायालयाने ८ सहस्र ६५८ वर्षांची शिक्षा ठोठावली. ‘ए ९’ नावाच्या वाहिनीद्वारे कट्टरता पसरवणारा हा इस्लामी उपदेशक त्याच्या कपड्यांमुळे, तसेच अवतीभोवती असलेल्या महिलांच्या गराड्यामुळे नेहमी चर्चेत असायचा.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओकतार जेव्हा वरील वाहिनीद्वारे कट्टरता पसरवणारे भाषण करत असे, तेव्हा त्याच्या अवतीभोवती तोकड्या कपड्यांतील महिला उपस्थित असायच्या. या महिलांना तो ‘किटन्स’ (मांजराचे पिल्लू) असे संबोधत होता, यासह तो या महिलांसमवेत नाचतही असे. त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती. न्यायालयाने सांगितले की, अदनान ओकतार याला १ सहस्र प्रेयसी आहेत ! वर्ष २०१८ मध्ये पोलिसांने त्याच्या घरात ६९ सहस्र गर्भनिरोधक गोळ्या आढळून आल्या होत्या.

यापूर्वीही दोनदा ठोठावली होती शेकडो वर्षांची शिक्षा !

१. अदनान ओकतार याला बलात्कार, ब्लॅकमेल, आर्थिक हेराफेरी आणि हेरगिरी यांप्रकरणी गेल्या वर्षी, म्हणजे वर्ष २०२१ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने १ सहस्र ७५ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तथापि वरिष्ठ न्यायालयाने हा निर्णय रहित केला.

२. त्यापूर्वीही ओकतार याला अनेक प्रकरणांतील गुन्ह्यांसाठी ८१९ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्याने केलेल्या अपराधांची सूची इतकी मोठी आहे की, त्याने त्याची शिक्षा वाढवून ती ८ सहस्र ६५८ वर्षे इतकी करण्यात आली.

मला शिक्षा देण्याचा निर्णय अल्लाचा आहे ! – अदनान ओकतार

शिक्षा ऐकल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना अदनान ओकतार न्यायालयाला म्हणाला, ‘‘माझे तुमच्यावर प्रेम आहे. मला आपल्या सरकारवरही पूर्ण विश्वास आहे. या निर्णयामुळे (त्याला झालेल्या शिक्षेमुळे) मी आनंदी आहे. हा अल्लाचा निर्णय आहे.  माझ्या जीवनात चांगले दिवस आले आहेत. इस्लाम संपूर्ण जगावर राज्य करेल. तुर्कीये एक सुंदर देश बनेल. माझ्या शिक्षेचा निर्णय लाभदायी असेल.’’

संपादकीय भूमिका

  • केवळ हिंदूंच्या विरोधात फतवे काढणारे धर्मांध अशांविरुद्ध फतवे का काढत नाहीत ?
  • कुठे भक्तांना मोक्षाचा शाश्वत मार्ग दाखवून त्यांच्याकडून तसे आचरण करून घेणारे हिंदु धर्मातील साधू-संत, तर कुठे असंख्य अपकृत्यांत अडकलेले अन्य पंथांचे उपदेशक ! यावरून हिंदु धर्माची महानता अधोरेखित होते !