मुसलमान प्रियकराने हिंदु प्रेयसीची हत्या करून केले ३५ तुकडे !

देहलीत ‘लव्ह जिहाद’चा अमानुष तोंडवळा उघड !

  • शीतकपाटात ठेवलेले होते तुकडे !

  • १८ दिवस बाहेर नेऊन फेकत होता एकेक तुकडे !

डावीकडे आरोपी आफताब शेख

नवी देहली – ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या (विवाह न करता एकत्र रहाणार्‍या) आफताब शेख याने प्रेयसी श्रद्धा मदान (वय २६ वर्षे) हिची हत्या करून तिचे ३५ तुकडे केले. त्याने हे तुकडे शीतकपाटात ठेवून १८ दिवस प्रतिदिन रात्री थोडे थोडे तुकडे बाहेर फेकल्याची घटना येथे ६ मासांपूर्वी घडल्याचे आता उघडकीस आले आहे. पोलिसांनी आफताब याला अटक केली आहे. श्रद्धा मूळची मुंबईच्या मालाड येथील आहे. या दोघांची ओळख एका ‘कॉल सेंटर’मध्ये झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ते नवी देहलीत येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होते. श्रद्धाच्या वडिलांनी ८ नोव्हेंबर या दिवशी पोलिसांत अपहरणाची तक्रार प्रविष्ट केली होती.

१. श्रद्धा मुंबईच्या मालाडमध्ये एका बहुराष्ट्रीय आस्थापनाच्या ‘कॉल सेंटर’मध्ये काम करत होती. तेथेच आफताब आणि तिची भेट झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले; पण त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर अप्रसन्न होते. यामुळे ते दोघेही मुंबईहून देहलीत रहायला गेले. ते महरौलीच्या एका फ्लॅटमध्ये ‘लिव्ह इन’मध्ये रहात होते.

२. दक्षिण देहलीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अंकित चौहान यांनी सांगितले की, १८ मे या दिवशी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. आफताबने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर केला. त्याने प्रथम तिच्या हाताचे तीन तुकडे केले. त्यानंतर पायाचेही ३ तुकडे केले. हत्येनंतर त्याने हे सर्व तुकडे शीतकपाटात ठेवले. हे तुकडे घेऊन तो प्रतिदिन रात्री २ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडत होता. हे तुकडे त्याने महरौलच्या जंगलात नेऊन वेगवेगळ्या भागांत फेकले.

३. श्रद्धाने १८ मेपासून कुटुंबाचा दूरभाष उचलणे बंद केले. यामुळे चिंताग्रस्त झालेले तिचे वडील विकास मदान मुलीची विचारपूस करण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी देहलीला गेले. तेथे तिच्या फ्लॅटला कुलूप होते. त्यांनी महरौली पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार प्रविष्ट केली. वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आफताबला अटक केली. चौकशीत त्याने श्रद्धाची हत्या केल्याचे मान्य केले. तो म्हणाला, ‘आमच्यात नेहमीच भांडण होत होते. ती लग्नाचा तगादा लावत होती. याला कंटाळून मी तिची हत्या केली.’ आता पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध चालू केला आहे.

संपादकीय भूमिका

  • धर्मांध मुसलमानांची याहून अधिक अमानुष ओळख होऊ शकत नाही, हे हिंदू तरुणींनी लक्षात घ्यावे !
  • या घटनेविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, राजकीय पक्ष, मुसलमान संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • राजधानी देहलीतील तरुणींची अशी स्थिती होत असेल, तर देशातील ग्रामीण भागांच्या स्थितीची कल्पनाही करता येणार नाही ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करते !
  • आणखी किती हिंदु मुलींचे बळी गेल्यानंतर सरकार देशपातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे ?