उज्जैन येथील कॉन्व्हेंट शाळेतील ख्रिस्ती शिक्षक विद्यार्थिनींना दाखवत होता अश्‍लील व्हिडिओ !

  • पालकांच्या तक्रारीनंतर अटक

  • शाळेच्या व्यवस्थापनाकडून प्रकरण दाबण्याचा झाला होता प्रयत्न !

अटक करण्यात आलेला शिक्षक लिजॉय (चौकटीत)

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील तरानामध्ये असलेल्या ‘दिनाह कॉन्व्हेंट शाळेमधील शिक्षक लिजॉय याला विद्यार्थिनींना अश्‍लील व्हिडिओ दाखवणे आणि त्यांना ‘आय लव्ह यू’, ‘चुंबन’, असे शब्द शिकवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थिनींनी याविषयी पालकांना माहिती दिल्यावर पालिकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आले. तत्पूर्वी पालक आणि हिंदु संघटनांचे कार्यकर्ते यांनी शाळेबाहेर घोषणाबाजी केली, तसेच दगडफेक केली. पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

१. विद्यार्थिनींनी सांगितले, ‘या प्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनला सांगण्यात आले होते; मात्र त्यांनी याकडे लक्ष न देता प्रकरण दाबून टाकले.’ पोलीस आता शाळेच्या व्यवस्थापनाचीही चौकशी करणार आहेत.

२. एका विद्यार्थिनीच्या पालकांनी सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेतील घटना घरी सांगितल्यावर शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती, तसेच तिच्या हस्तक्षरात एक पत्र लिहून घेण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

  • अशा शाळेची मान्यता रहित करून तिच्या संबंधित प्रमुखांना अटक केली पाहिजे !
  • ज्या प्रमाणे उत्तरप्रदेशात मदरशांचे सर्वेक्षण करण्यात आले, तसेच आता देशातील कॉन्व्हेंट शाळांचेही सर्वेक्षण करून तेथे काय शिकवले जाते ? हिंदु विद्यार्थ्यांवर कोणती बंधने घातली जातात ? याची माहिती घेण्याची आता आवश्यकता आहे !