सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा ‘समुद्री चाचे’ याऐवजी ‘नौदलाचे अधिकारी’ म्हणून ‘गूगल’कडून उल्लेख !

शिवप्रेमींच्या तीव्र विरोधाचा परिणाम !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्री आरमार उभे करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचा ‘गूगल’वर ‘समुद्री चाचे’ असा उल्लेख करण्यात आला होता. हे लक्षात आल्यावर अनेक शिवप्रेमींनी यावर टीका केली. सर्वच बाजूंनी विरोध झाल्याने गूगलने कान्होजी राजे आंग्रे यांचा उल्लेख ‘नौदलाचे अधिकारी’ असा केला. याआधी ‘विकिपीडिया’ या संकेतस्थळानेही त्यांचा उल्लेख ‘समुद्री चाचे’ असा केला होता; पण याविषयी आक्षेप घेतल्यावर विकिपीडियाने त्यात सुधारणा केली; पण गूगलवर तसाच उल्लेख ठेवण्यात आला होता. (हा गूगलचा इतिहासद्वेषच होय ! – संपादक)

सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांनी ब्रिटीश, डच आणि पोर्तुगीज यांची अनेक आक्रमणे त्यांनी परतवून लावली होती.

संपादकीय भूमिका

शिवप्रेमींनो, इतिहासद्रोही ठरणार्‍या सर्वच घटनांना अशा प्रकारे ठामपणे विरोध करून राष्ट्रकर्तव्य पार पाडा !