विवाहाला नकार दिल्याचे प्रकरण !
गौहत्ती (आसाम) – आसामच्या गौहत्ती शहरात अंजली बिस्वास नावाच्या हिंदु मुलीने विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने रफिक अली नावाच्या मुसलमान तरुणाने तिला चाकूने भोसकून घायाळ केल्याची घटना नुकतीच घडली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक अलीने अंजली बिस्वास हिच्यावर ती कामावर जात असतांना धारदार चाकूने आक्रमण केले. रफिक अलीने तिचे हात, डोळे, चेहरा, मान, छाती आणि पोट यांवर चाकूने वार केले. मुलीने आरडाओरडा करताच स्थानिकांनी धाव घेऊन तिची सुटका केली. रफिक पळून गेला; मात्र नंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
#असम से
आज अंजलि बिस्वास (25) को #गुवाहाटी के नरेंगे सैन्य शिविर क्षेत्र के पास रफीक अली द्वारा छाती, चेहरे, पेट, हाथ में बेरहमी से चाकू मार दिया गया। उसकी हालत गंभीर है और उसका इलाज GMC अस्पताल में चल रहा है। @HinduVoice_in pic.twitter.com/JIAPWzYHbh— S.D. Ratnu सेवानिवृत्त न्यायीक अधिकारी (@Sainidan1) October 8, 2022
गंभीररित्या घायाळ झालेल्या त्या मुलीला गौहत्ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तिला अतीदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असून पूर्ण बरी होण्यासाठी बरेच दिवस लागतील, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आरोपी रफिक अनेक दिवसांपासून पीडित हिंदु मुलीच्या मागे लागला होता; परंतु मुलीने त्याच्या विवाहाच्या प्रस्तावाला नकार दिला होता. रफिक याने तिला अनेकदा धमक्याही दिल्या होत्या; मात्र मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
संपादकीय भूमिकादेशाच्या काना-कोपर्यात मुसलमान युवक हिंदु मुलींचा शीलभंग करत आहेत, तसेच सशस्त्र आक्रमणे करत आहेत ! या समस्येची दिवसेंदिवस वाढत जाणारी भीषणता पाहून सरकारने यासंदर्भात आता तरी कठोर कारवाई करणे आवश्यक ! |