खेडा (गुजरात) येथे मुसलमानांकडून गरबा कार्यक्रमावर दगडफेक : ६ जण घायाळ  

खेडा (गुजरात) – येथील उंधेला गावात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमावर धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत ६ जण घायाळ झाले. ३ ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील प्रमुखांनी हा गरबा कार्यक्रम आयोजित केला होता. येथून जवळच मंदिर आणि मशीद आहे. कार्यक्रम चालू होण्याआधी काही लोकांनी येऊन तो बंद करण्यास सांगितले; मात्र हिंदूंनी नकार दिल्यावर आरिफ आणि जाहीर यांनी त्यांच्या साथीदारांसह कार्यक्रमावर दगडफेक केली, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक राजेश गाधिया यांनी दिली. ‘पोलीस आरोपींची ओळख पटवत असून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल’, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारतात बहुसंख्य हिंदू असतांना त्यांच्या धार्मिक कार्यक्रमांवर अल्पसंख्य आक्रमण करतात, असे जगात कुठेही होत नाही, हे लक्षात घ्या !
  • गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !