सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
नवरात्रीच्या कालावधीत गुरूंनी (टीप) दिली सुंदर भेट ।
भाववृद्धी सत्संगरूपी सत्संगांमधून दिला त्यांचा सुंदर प्रसाद ।। १ ।।
नऊ दिवस गुरूंमुळे घडले नवदुर्गांचे सुंदर दर्शन ।
साक्षात् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या
मुखातून ऐकायला मिळाले देवीचे सुंदर वर्णन ।। २ ।।
नऊ दिवस अनुभवायला मिळाले देवीला ।
देवीची सेवा देऊन गुरूंनी धन्य धन्य केले आम्हाला ।। ३ ।।
गुरूंच्या कृपावर्षावाला नसे पारावार ।
खरेच गुरूंचा महिमा आहे अपरंपार ।। ४ ।।
गुरुराया, तुमची कृपा संपादन करण्यास अल्प पडतो आम्ही ।
मनातील निरर्थक विचारांमध्ये राहूनी तुम्ही
दिलेल्या दिव्य आनंदाला मुकतो आम्ही ।। ५ ।।
गुरुराया, तुम्हीच मुक्त करू शकता मनातील विचारांतून ।
‘तुमच्या नामाचा महिमा अखंड गायला जाऊ दे मनातून’ ।
ही एकच प्रार्थना तुमच्या चरणी ।। ६ ।।
टीप : परात्पर गुरु डॉ. आठवले
– गुरुचरणी अर्पण,
श्री. देवदत्त व्हनमारे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), सोलापूर (२.१२.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |