वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा !

वर्धा, २२ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने नुकतेच वर्धा जिल्ह्यात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात आले. याअंतर्गत पुढील कार्यक्रम झाले.

१. नुकतेच महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचे स्थानिक हिमालय विश्व भागातील श्री गणेश मंदिरामध्ये ‘संस्कृतीरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन झाले. त्यानंतर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमाला १२५ हून अधिक धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.

२. वर्धा येथे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सिंधी पंचायतच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली. या वेळी त्यांना ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राविषयी त्यांना विस्तृत माहिती देण्यात आली.

३. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सेलू येथील श्री. शीतलदास मठ येथे समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘हलाल जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमाला लाभ ३० हून अधिक धर्मप्रेमी व्यावसायिक आणि नागरिक उपस्थित होते. देवळी येथे स्थानिक श्रीराम मंदिरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात श्री. घनवट यांनी ‘हलाल जिहाद’ची वास्तविकता उपस्थितांसमोर मांडली. याप्रसंगी अनेक धर्मप्रेमी व्यावसायिक उपस्थित होते.