सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा आणि कृतज्ञताभाव असणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना साधनेत येण्यापूर्वी अनेक कठीण प्रसंगांतून जावे लागले; पण घरातील धार्मिक वातावरण आणि बालपणापासून देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे ते निर्भयतेने या प्रसंगांना सामोरे गेले. वर्ष १९९७ मध्ये ते साधनेत आले. गुरूंवरील अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव यांमुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन ३.६.२०१९ या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. गुरुकृपेने तीव्र प्रारब्धही न्यून होते, याचीही त्यांनी अनुभूती घेतली. ‘गुरुकृपा होण्यासाठी सातत्याने साधनारत राहून चिकाटीने कसे प्रयत्न करायचे ?’, याचा वस्तूपाठच त्यांनी त्यांच्या जीवनपटातून साधकांसमोर ठेवला आहे. त्यांचा हा साधनाप्रवास साधकांना साधनेसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

मागील भागात आपण पू. कुलकर्णीकाका यांनी ‘श्री गणेशमूर्तींचा आकार आणि विसर्जन’इत्यादी सूत्रांच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधात दिलेल्या यशस्वी लढ्यातील त्यांचे योगदान पाहिले. आताच्या या ७ व्या भागात आपण ‘धुळे येथील दंगलीत हिंदूंवर झालेली आक्रमणे आणि पू. कुलकर्णीकाका यांना दंगलीचे अन्वेषण करणार्‍या ‘हिंदूंच्या सत्यशोधन समिती’त सहभागी होता येणे’ हा भाग पहाणार आहोत.   

(भाग ७)

भाग ६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/613178.html


(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

३. धुळे येथील दंगलीत हिंदूंवर झालेली आक्रमणे

३ अ. धुळे येथील दंगलीत पोलिसांवर जीवघेणी आक्रमणे होणे : ६.१.२०१३ मध्ये धुळे येथे भीषण दंगल झाली. धर्मांधांच्या दगडफेकीत १०७ पोलीस घायाळ झाले होते. प्रत्येक दंगलीत पोलिसांवर जीवघेणी आक्रमणे होतात, तरी शासनकर्त्यांना खुश करण्यासाठी लाचार पोलीस धर्मांधांना ‘ईफ्तार’च्या मेजवान्या देतात. अशांना ‘कणाहीन, भेकड, लांगूलचालन करणारे’, अशी कितीही विशेषणे लावली, तरी ती अल्पच आहेत. सर्वच पोलीस तसे नाहीत. तुकाराम ओंबाळेसारख्या (प्राणांची बाजी लावून मुंबईवरील २६/११ मधील आक्रमणातील अतिरेक्यांना पकडणारे साहसी पोलीस कर्मचारी श्री. ओंबाळे यांच्यासारख्या) सहस्रो पोलिसांमुळे सर्व जगात मुंबई पोलिसांनी नावलौकिक मिळवला आहे.

३ आ. धर्मांधांनी हिंदूंच्या वस्त्यांवर ‘पेट्रोल आणि ॲसिड बाँब’ टाकणे : धर्मांधांनी हिंदूंच्या वस्त्यांवर ‘पेट्रोल आणि ॲसिड बाँब’ टाकले. हिंदूंच्या घरात धर्माध झुंडशाहीने प्रवेश करून ‘गॅस’चे बटण चालू करायचे आणि लांबून पेटती काडी फेकायचे. त्यामुळे ‘गॅस’चा स्फोट व्हायचा. त्यांनी हिंदु माता, भगिनी आणि बांधव यांच्यावर जीवघेणी आक्रमणे केली.

३ इ. धर्मांधांची आक्रमकता पाहून धुळे जिल्हाधिकार्‍यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश देणे आणि त्यामुळे पोलिसांवर कारवाई करण्यासाठी राजकीय दबाव येणे : पोलीस धर्मांधांना थांबवायचा प्रयत्न करत होते; मात्र धर्मांध अधिकच आक्रमक होत होते. ते पोलीस आणि प्रशासन यांचे ऐकत नव्हते; म्हणून धुळे जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना गोळीबार करायचा आदेश दिला. त्यात ७ धर्मांध ठार झाले. काँग्रेस सरकारचे ‘प्रियजन’ ठार झाले. विचार करा, ‘काय थयथयाट झाला असेल ?’ शिवसेना आणि भाजप सोडून भारतभरातील सर्व राजकीय पक्ष, प्रसिद्धीमाध्यमे, धर्मांधांच्या वेगवेगळ्या संघटना यांनी ‘जिल्हाधिकारी आणि पोलिसांचे जिल्हाप्रमुख यांना निलंबित करा. त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे लावा’, यांसाठी आग्रह धरला होता. या प्रकरणात राजकीय दबाव पुष्कळ होता. तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते.

३ ई. दंगलीचे अन्वेषण करणार्‍या ‘हिंदूंच्या सत्यशोधन समिती’त सहभागी होता येणे

३ ई १. हिंदूंसाठी असलेल्या अशासकीय संस्थेमध्ये (नॉन-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन एन्.जी.ओ. मध्ये) सहभागी होता येणे : अनेक अशासकीय संस्था (एन्.जी.ओ.) धुळ्यात ठाण मांडून बसल्या होत्या. धर्मांधांच्या अनेक अशासकीय संस्था (एन्.जी.ओ.) होत्या, तर हिंदूंच्या संस्था मात्र नगण्यच होत्या. निवृत्त पोलीस महासंचालक श्री. वाय्.सी. पवार, पू. (अधिवक्ता) चपळगावकर, श्री. अभय वर्तक (धर्मप्रचारक, सनातन संस्था), साधक श्री. अरविंद पानसरे, ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद कुळकर्णी आणि पत्रकार श्री. जयेश मेस्त्री यांच्या समवेत मला गुरुकृपेने अशासकीय संस्थेच्या (एन्.जी.ओ.च्या) समितीत घेण्यात आले. ही ‘हिंदूंची सत्यशोधन समिती’ दंगलीचे अन्वेषण करणार होती. आम्ही ३ दिवस धुळ्यात होतो. इतर अनेक अशासकीय संस्था (एन्.जी.ओ.) धर्मांधांना साहाय्य करण्यासाठी तिथे उपस्थित होत्या. यात तिस्ता सेटलवाड हिचा नातेवाईक फिरोज मिठीबोरवाला, साम्यवादी आणि पुरोगामी यांची नावे अग्रक्रमाने होती.

३ ई २. हिंदूंना ‘त्यांची किती हानी झाली ?’, हे सांगता न येणे, तर धर्मांध ‘त्यांची लाखो रुपयांची हानी झाली’, असे निर्भीडपणे सांगत असणे : आम्ही प्रतिदिन दंगल झालेल्या भागात ‘नागरिकांची किती हानी झाली ?’, हे पहायला जायचो. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली दगडफेक आणि मारहाण यांमध्ये दुखापत झालेल्या पोलिसांनी दिलेला वृत्तांत ऐकून ‘हे धर्मांधांचे भयानक षड्यंत्र होते’, असे लक्षात आले. धर्मांधांनी हिंदूची घरे-दारे, संसार इत्यादींची जाळून राखरांगोळी केली होती. धर्मांधांच्या घरात जर्मनची (स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्‍या निकृष्ट धातूची) भांडीकुंडी होती, तरीही ‘ते आमची लाखो रुपयांची हानी झाली’, असे निर्भीडपणे सांगत होते; मात्र हिंदूंच्या घरांना आगी लावून त्यांची राखरांगोळी करण्यात आली, तरी त्यांना ‘आपली किती हानी झाली ?’, हे सांगता येत नव्हते. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘आपत्काळात कसे वागायचे ?’, हे आम्हा हिंदूंना कोणी शिकवलेलेच नाही, याचा हा परिणाम होता.

३ ई ३. सत्यशोधन समितीचा अहवाल ‘धर्माधांचा भूमी-जिहाद’ अधोरेखित करणारा असणे : ‘येथे धर्मांधांचा आक्रस्ताळेपणा दंगल होण्यासाठी कारणीभूत ठरला’, असे निवृत्त पोलीस महासंचालक श्री. वाय्.सी. पवार, पू. (अधिवक्ता) चपळगावकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद कुळकर्णी यांच्या लक्षात आले. आमचा अहवाल ‘या दंगलीला धर्माधांचा ‘भूमी-जिहाद’ कारणीभूत आहे’, असे स्पष्ट करणारा होता. ‘हिंदूंच्या विभागात दंगली केल्या की, हिंदू जागा सोडून जातात. नंतर त्या जागा कवडीमोलाने विकत घ्यायच्या’, असे हे धर्मांधांचे षड्यंत्र होते. तेथील अनेक वसाहतींना ‘गणेश कॉलनी’, ‘लक्ष्मी नगर’ अशी नावे होती; पण तिथे धर्मांधच मोठ्या संख्येने  रहात असल्याचे आढळले. गेल्या अनेक वर्षांत धुळे येथे झालेल्या दंगलींचा वृत्तांत देऊन आम्ही धुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मताचे समर्थन केले आणि ‘त्यांना निलंबित करू नये’, असे स्पष्टपणे नमूद केले.

३ ई ४. दंगलीतील पीडित व्यापारी आणि जखमी झालेले पोलीस यांना भेटून त्यांना मानसिक आधार देणे : आम्ही पीडित व्यापारी आणि जखमी पोलीस यांना भेटलो. प्रत्येक जण आम्हाला त्याचे दुःख सांगत होता. पोलीस ‘आमचे निलंबन होऊ देऊ नका’, अशी आर्जवे करत होते. ज्या तरुण महिला पोलीस अधिकार्‍याने गोळीबार केला, त्या आम्हाला भेटायला आल्या होत्या. आम्ही त्यांना आधार दिला. आम्ही त्यांना ‘न्यायालयात आणि इतर सर्व प्रकारचे साहाय्य करू’, असे सांगितले. त्या सर्वांचा आमच्यावर विश्वास बसत होता.

३ ई ५. पत्रकार परिषद घेऊन सत्यशोधन समितीचा अहवाल त्यांच्यासमोर ठेवणे : मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी भेट नाकारल्याने ‘हा अहवाल पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यापुढे सादर करायचा’, असे ज्येष्ठ सदस्यांनी ठरवले. मी केवळ अनुमोदन द्यायचो. ‘श्री गुरु केवढी संधी देतात !’, याची प्रचीती मी गेली १५ वर्षे सातत्याने घेत आहे.

या सर्व घटनांवरून ‘आपत्काळात हिंदू सनातन संस्थेला शरण जातील’, असे मला वाटते. पीडित आणि सामान्य जनता यांना केवळ प.पू. गुरुदेवांचाच एकमेव आधार राहील. त्यांना एकच मार्ग असेल, तो म्हणजे ‘प.पू. गुरुदेवांना शरण जाणे !’ अशा प्रसंगांमुळे ‘प.पू. गुरुदेव सगळ्या ब्रह्मांडाचे पालनहार आहेत’, ही माझी श्रद्धा दृढ होते.’

(समाप्त)

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संभाजीनगर.

(३१.३.२०२२)