तमिळनाडूच्या ‘व्हीसीके’ पक्षाचे अध्यक्ष थिरुमावलावन् यांचा साळसूदपणा !
चेन्नई – तमिळनाडूतील हिंदु मंदिरांमध्ये कोणत्याही जातीचे पुजारी नेमण्याचा प्रस्ताव सरकारने सादर केला आहे. त्याच्या विरोधात हिंदु पुजारी संघटनांनी आंदोलने आणि विरोधप्रदर्शने केल्यानंतर ‘विदुथलाई चिरुथाईगल कच्ची’चे (‘व्हीसीके’चे) अध्यक्ष थिरुमावलावन् यांनी सांगितले, ‘द्रमुक सरकारचा ‘हिंदु मंदिरांत पुजारी म्हणून कुठल्याही जातीच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव’ सर्व हिंदूंच्या हक्काचे रक्षण करत असल्याने त्याचे समर्थन केले पाहिजे. द्रमुक आणि ‘व्हीसीके’ पक्ष हिंदूंच्या विरोधात असल्याच्या टीकेला उत्तर देण्याचा थिरुमावलावन् यांचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. ‘व्हीसीके’चे सभागृहातील नेते सिंथनाई सेल्वन म्हणाले की, पक्षाला हिंदु धर्मात समानता हवी आहे.
‘तमिळनाडूतील हिंदु मंदिरांमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती व्यक्तींनाही पुजारी म्हणून नेमण्याची द्रमुक सरकारची योजना आहे’, असे हिंदू पुजारी संघटनांचे मत आहे. (असे असेल, तर हिंदूंनी संघटित होऊन याला प्रस्तावाला वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक ! – संपादक) राज्यातील हिंदू पुजारी संघटनांनी हिंंदु मंदिरांच्या व्यवस्थापनात सरकारच्या हस्तक्षेपाला कडाडून विरोध केला आहे.
संपादकीय भूमिकातमिळनाडूतील द्रमुक सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी नव्हे, तर हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी कारवाया करत आहे, हे सूज्ञ हिंदू जाणून आहेत ! |