भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी आणि अन्य कह्यात !
कोलकाता – बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपने आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. कोलकात्यात ‘चलो नबान्न’ (राज्य सचिवालय) या नावाने चालू असलेल्या भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असलेले भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी, तसेच राहुल सिन्हा आणि लॉकेट चॅटर्जी यांना कोलकाता पोलिसांनी कह्यात घेतले.
बंगाल में नबान्न चलो रैली में पुलिस ने शुभेंदु अधिकारी को हिरासत में लिया https://t.co/CoPFEcrIIm
— Bharatnewspost (@Bharatnewspost1) September 13, 2022
१. १४ सप्टेंबर या दिवशी ‘चलो नबान्न’ नावाने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून भाजपचे कार्यकर्ते राजधानीत पोचत आहेत.
२. भाजपच्या कार्यकर्त्यांची राणीगंज रेल्वेस्थानकावर पोलिसांशी संघर्ष झाला. अशीच घटना राज्यातील बोलपूर रेल्वेस्थानकावर झाल्याचे म्हटले जात आहे.
३. आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी ‘बॅरिकेड्स’ लावल्याने कोलकात्यातील हावडा पूल पुष्कळ घंटे जाम झाला होता.
४. कोलकाता पोलिसांनी सांगितले की, भाजपच्या आंदोलनाला पोलिसांनी अनुमती दिली नव्हती.
५. राज्यातील सीतलकुची येथे ११ सप्टेंबर या दिवशी भाजपच्या निषेध मोर्च्यावर देशी बाँब फेकण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये भाजपचे २ कार्यकर्ते घायाळ झाले.
ममता बॅनर्जी या उत्तर कोरियातील हुकुमशहासारख्या वागत आहेत ! – भाजप
भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केला की, आमचे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने चालू आहे. भ्रष्टाचार आणि बेरोजगारी यांना आमचा विरोध आहे. बंगालची जनता ममता बॅनर्जी यांच्यासमवेत नसल्याने त्या उत्तर कोरियातील हुकुमशहासारख्या वागत आहेत.
संपादकीय भूमिकाकायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेल्या आणि अनेक घोटाळ्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील मंत्री अन् नेते यांची नावे असलेल्या बंगाल राज्यात अशी आंदोलने करण्यापेक्षा तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक ! |