गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्‍याला ठार मारण्याची धमकी

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील लोहियानगरातील आंबेडकर कॉलनीमध्ये रहाणारे डॉ. अरविंद वत्स अकेला यांना ते हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे काम करतात म्हणून अज्ञाताकडून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून सायबर शाखेचे पोलीस याचे अन्वेषण करत आहेत.
अरविंद वत्स ‘हिंदु स्वाभिमान मंच’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे प्रमुख आहेत. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर अज्ञातांकडून धमकीचा दूरभाष आला होता. पहिल्यांदा त्यांनी तो स्वीकारला नाही. दुसर्‍या दिवशी पुन्हा आल्यानंतर तो स्वीकारल्यावर समोरून बोलणार्‍याने धमकी देतांना म्हटले की, तू हिंदु संघटनेचे काम करतो. यामुळे तुझा शिरच्छेद केला जाईल. तुझ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. तुला कुणीही वाचवू शकत नाही.