पाकिस्तानी अधिवक्त्या झैनाब खान यांचा दावा
काश्मीर विश्वविद्यालातील विद्वानाच्या शोधनिबंधाचा हवाला देत केला दावा !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात होणार्या हिंदु-मुसलमान यांच्यातील विवाहांमध्ये ९४.८ टक्के वेळा पुरुष हा मुसलमान असतो. तसेच या विवाहांपैकी ६८ टक्के विवाहांचा अंत हा घटस्फोटात होतो, ७३ टक्के प्रकरणांमध्ये महिलांना शारीरिक अत्याचारांना सामोरे जावे लागते, ६५ टक्के महिला ५० वर्षे वयाच्या आधीच मृत्यू पावतात, तर १२ टक्के प्रकरणात महिला आत्महत्या करतात. यासमवेतच घरगुती हिंसेमुळे मृत पावलेल्या भारतीय महिलांच्या सरासरीशी तुलना केली, तर हिंदु-मुसलमान यांच्यातील वैवाहिक जीवनात हेच प्रमाण तब्बल १२ पटींनी अधिक आहे. ‘झैनाब खान’ नावाच्या एका प्रसिद्ध पाकिस्तानी महिलेने वरील दावे ट्वीट करून केले आहेत. यासाठी त्यांनी काश्मीर विश्वविद्यालातील विद्वान हिलाल अहमद कुमार यांनी कर्णावती येथे झालेल्या एका कार्यक्रमात सादर केलेल्या शोधनिबंधाचा संदर्भ दिला आहे.
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’ ही कपोलकल्पित संकल्पना आहे’, असे म्हणणार्या कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना यावर काय म्हणायचे आहे ? |