पीडितेच्या वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा नोंदवल्याने हिंदू अप्रसन्न

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे हिंदु मुलीची मुसलमान तरुणांकडून छेड काढण्यात येत असल्याने हिंदूंनी येथून पलायन करण्याची सिद्धता चालू केली आहे. त्यांनी त्यांच्या घरावर ‘घर विकणे आहे’, असे फलक लावले आहेत. येथील हिंदू हे मागासवर्गीय आहेत.
१. गावातील मुन्ना, मोहसिन, इमरान आणि जीशान यांनी एका हिंदु मुलीची छेड काढून तिला मारहाण केली हेती. तिला खेचून पळवून नेण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या तक्रारीवरून मुलीच्या वडिलांवरही गुन्हा नोंदवला आहे. (हिंदूंवर अन्याय झाला असतांना त्यांना आश्वस्त करण्याऐवजी मुसलमानांच्या सांगण्यावरून हिंदूंवर गुन्हे नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक) यामुळे येथील हिंदू अप्रसन्न आहेत. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन निषेध नोंदवला. त्यानंतर त्यांनी गावातून पलायन करण्याची घोषणा केली.
२. यानंतर पोलिसांनी पीडितेच्या घरी जाऊन आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन देत ‘घर विकणे आहे’ हे फलक काढून टाकले.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! हिंदूंना सहकार्य न करणार्या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे ! |
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ