शामली (उत्तरप्रदेश) येथे ग्रामदेवतेच्या वार्षिक कार्यक्रमापूर्वी मंदिरात अज्ञातांनी फेकले मांस !

गावात तणावपूर्ण स्थिती


मंदिरात मांसाचे तुकडे फेकल्याच्या घटनेनंतर तणावाचे वातावरण

शामली (उत्तरप्रदेश) – शामली जिल्ह्यातील सिक्का गावातील भूमिया खेडा या ग्रामदेवतेच्या मंदिरात अज्ञातांनी मांस फेकल्याची घटना घडली. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या मंदिरात ३ सप्टेंबरला वार्षिक यज्ञ, हवन आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी मंदिराच्या परिसरातील ११ ठिकाणी मांसाचे तुकडे सापडले. यापूर्वी या गावात कधी अशी घटना घडली नव्हती, असे गावकर्‍यांनी सांगितले. पोलिसांनी याची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी सर्व तुकडे उचलून परीक्षणासाठी पाठवून दिले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

देशात कुठेनाकुठे अशा प्रकारच्या घटना घडत असतात, यावरून हिंदूंच्या देवतांचा, मंदिरांचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न होत असतो, हे लक्षात येते ! यातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक !