अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या ७५ वर्षीय धर्मांधाला जन्मठेपेची शिक्षा

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथे वर्ष २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ७५ वर्षीय अकबर अली या वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसेच ५० सहस्र रुपयांचा दंडही केला आहे. अकबरी अली मूळचा बंगालमधील मालदा येथील रहाणारा आहे. नोएडा येथील त्याच्या मुलीच्या घरी तो आला होता. तेथे शेजारी रहाणार्‍या अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिला खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. (अशा वासनांधांना इस्लामी देशांत शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात पुरून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा केली जाते, तशी शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)