पाकिस्तानची टी. राजा सिंह यांच्यावर टीका करत कारवाईची मागणी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून पाकिस्तानने भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या ३ मासांत भाजपच्या नेत्यांकडून पैगंबर यांचा अवमान करण्याची ही दुसरी घटना आहे. अशा प्रकारच्या विधानांमुळे पाकिस्तानच नाही, तर संपूर्ण जगातील कोट्यवधी मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. भाजपकडून टी. राजा सिंह यांच्यावर किरकोळ कारवाई केल्याने संपूर्ण जगातील मुसलमानांचा आक्रोश शांत होणार नाही. हे निंदनीय आहे की, राजा सिंह यांना अटक केल्यानंतर लगेच जामीन मिळतो. भारत सरकारने त्यांच्यावर तात्काळ आणि निर्णायक कारवाई केली पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानने त्याच्या देशातील हिंदूंच्या संदर्भात काय घडत आहे, याकडे लक्ष देऊन त्यांचे रक्षण करून दाखवावे, असे भारताने पाकला सुनावले पाहिजे !
  • पाकिस्तान आणि अन्य इस्लामी देश त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाल्यावर लगेच भारताकडे जाब विचारतात; मात्र भारत या इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयी मौन बाळगतो !