भाजपने टी. राजा सिंह यांचे निलंबन रहित करावे ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

श्री. टी. राजासिंह

मुंबई – हिरवे अल्पसंख्यांक ही भाजपची मतपेटी नाही. भाजपने अल्पसंख्यांक धर्माच्‍या दबावाखाली टी. राजा सिंह यांना निलंबित करणे दुर्दैवी आहे. भाजपने टी. राजा सिंह यांचे निलंबन रहित करावे, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी भाजपकडे केली. ही मागणी न केल्यास भाजपच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढू’, असे पत्रही त्यांनी भाजपला पाठवले आहे.

श्री. अजयसिंह सेंगर

या वेळी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, हिंदू सेना, महाराणा प्रताप बटालियन या संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.