‘हलाल’सक्ती विरोधी कृती समितीची स्थापना !

कोल्हापूर येथे उद्योजक आणि व्यापारी यांची बैठक

‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी माहिती देतांना श्री. रमेश शिंदे

कोल्हापूर, २४ ऑगस्ट (वार्ता.) – धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ भारतात उभी केली जात आहे. जागतिक स्तरावर ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हा आतंकवादासाठी वापरला जात आहे. तरी याच्या विरोधात जागृती करण्यासाठी कोल्हापूर येथे उद्योजक, व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत ‘हलालसक्ती विरोधी कृती समिती’ची स्थापना करून त्या संदर्भात जागृती करण्याचा निर्धार एकमताने करण्यात केला. या बैठकीत ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लेखक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना ‘हलाल सर्टिफिकेशन’ याविषयी सविस्तर माहिती देऊन त्याच्या परिणामांविषयी अवगत केले. यानंतर सर्वांनीच उत्स्फूर्तपणे ‘हलालसंदर्भात जागृती करण्यासाठी कृती समितीची स्थापना करूया’, अशी एकमुखी मागणी केली.

ही कृती समिती विविध समाजातील सर्व स्तरांतील राष्ट्रनिष्ठ व्यक्ती आणि संघटना यांना सहभागी करून घेऊन ‘मॉल्स’ (मोठे व्यापारी संकुल), दुकाने, नागरिक, विविध संघटना, व्यापारी, उद्योजक, तसेच समाजातील प्रत्येक घटक यांच्यात ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संदर्भात जागृती करणार आहे. या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, उद्योजक यांचे प्रतिनिधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.