बंगालमधून अल्-कायद्याच्या दोघा संशयित आतंकवाद्यांना अटक

पोलीस आणखी १७ जणांच्या शोधात

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील खारीबाडी भागातून अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याच्या संदर्भातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे दोघेही मोठा घातपात करण्याच्या सिद्धतेत होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांना पकडण्यात आले. अब्दुर रकीब सरकार आणि काझी अहसानुल्लाह अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी १७ जणांची नावे समोर आली आहेत. पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत !