

बेंगळुरू, १३ ऑगस्ट (वार्ता.) – भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या आर्. टी. नगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना राखी बांधण्यात आली. सनातनच्या साधिका सौ. वनजा यांनी त्यांना राखी बांधली. या वेळी साधिका सौ. सुधा सदानंद याही उपस्थित होत्या. त्यावेळी बोम्माई यांना सनातन निर्मित सात्त्विक उत्पादने असलेला वैशिष्ट्यपूर्ण भेटसंच (गिफ्ट बॉक्स) भेट देण्यात आला. राखी बांधल्यानंतर ‘साधिकेचे आणि सनातन संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे कल्याण होऊ दे’, अशा शुभेच्छा बोम्माई यांनी दिल्या.
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !