अमरावती येथे तरुणीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधास अटक !

वासनांध धर्मांध !

अमरावती – गावात बांधकाम करण्यासाठी आलेल्या अरमान उपाख्य ऐफाज उपाख्य गोलू इबादउल्ला खान याची एका महाविद्यालयीन तरुणीसमवेत ओळख झाली. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्याने तिला फिरायला नेऊन बळजोरीने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी तरुणाविरुद्ध १ ऑगस्ट या दिवशी बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. २० जुलै २०२१ ते ३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत अरमान याने तिचे लैंगिक शोषण केले. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला.