इजिप्तमध्ये लोकांमध्ये धाक निर्माण होण्यासाठी फाशीच्या शिक्षेच्या कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण करण्याचा न्यायालयाचा आदेश !

यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचाही आदेश

प्रतीकात्मक छायाचित्र

कैरो (इजिप्त) – इजिप्तमधील मंसौरा फौजदारी न्यायालयाने नायरा अशरफ या विद्यार्थिनीची हत्या करणारा महंमद आदिला याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे, तसेच त्याला फाशी देण्याच्या घटनेचे थेट प्रक्षेपण करण्याचा आदेश दिला आहे. ‘असे केल्याने  अशा प्रकारच्या हत्या थांबवता येतील. लोकांमध्ये धाक निर्माण होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने यासाठी संसदेत कायद्यात सुधारणा करण्याचा आदेशही दिला आहे. नायरा हिने विवाह करण्यास नकार दिल्याने आदिल याने तिचा शिरच्छेद केला होता.

संपादकीय भूमिका

‘गुन्हेगारांवर वचक कसा निर्माण करायचा ?’, हे इजिप्तमधील न्यायालयाकडून शिका ! भारतातही असे होण्यासाठी शासनकर्त्यांनी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !