जर ५० टक्के हिंदूही जागृत झाले, तरी मुसलमान इतिहासजमा होतील !

इस्लामी अभ्यासकाचे हे वक्तव्य असलेला एक जुना व्हिडिओ पुन्हा झाला प्रसारित !

डॉ. सैयद रिजवान अहमद

नवी देहली – गेल्या काही दिवसांपासून हिंदूंच्या हत्या करण्याच्या षड्यंत्रांचा भांडाफोड होत आहे. अनेक मुसलमान अभ्यासकांकडून हिंदुविरोधी वक्तव्ये केली जात आहेत. यातच डॉ. सैयद रिजवान अहमद नावाच्या एका इस्लामी अभ्यासकाचा काही वर्षांपूर्वीच्या व्हिडिओचा काही भाग (क्लिप) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे (‘व्हायरल’ होत आहे). ‘मोगलांनी हिंदूंवर अनेक शतके राज्य केले आहे आणि आताही ते पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतात !’, या कट्टरतावादी मुसलमानांच्या वक्तव्याला डॉ. सैयद यांनी, ‘आता मूठभर हिंदू जागृत झाले आहेत. केवळ ३० ते ३५ टक्के हिंदू जागृत झाले आहेत; पण तेही घटनात्मक आणि लोकशाही दृष्टीकोनातून ! जर हिंदूंचे डोके फिरले आणि ५० टक्के हिंदूही जागृत झाले, तरी मुसलमानांना वाचण्यासाठी जागा रहाणार नाही. ते इतिहासजमा होतील’, असे सडेतोड उत्तर दिले आहे.

‘फेस टू फेस’ नावाचे यू ट्यूब चॅनेल चालवणारे डॉ. सैयद या व्हिडिओमध्ये म्हणतांना दिसत आहेत की…

. जर मुसलमानांना ‘आमच्या पूर्वजांनी हिंदूंवर ८०० वर्षे राज्य केले’, याचे स्मरण होत आहे आणि त्याविषयी तुम्हाला अभिमान वाटत असेल, तर लक्षात ठेवा की, जर या देशातील हिंदूंना गेल्या ८०० वर्षांच्या कालखंडातील सर्व अत्याचार अन् त्यांच्यावर झालेला अन्याय आठवला, तर तुम्हाला हिंदुस्थानात लपण्यासाठीही जागा मिळणार नाही ! तुम्ही आणि तुमची मुले मारली जातील अन् त्यात आमचाही अंत होईल.

२. सुदैवाने हिंदूंना पूर्ण ८०० वर्षांमध्ये त्यांच्यावर झालेले अत्याचार लक्षात नाहीत. ते आज केवळ मथुरा आणि काशी यांचीच गोष्ट करत आहेत. जर त्यांना संपूर्ण ८०० वर्षांच्या कालखंडातील त्यांच्यावर झालेले अत्याचार आठवले, तर ते ३० सहस्र मंदिरांविषयी बोलू लागतील. असे झाले, तर नमाजपठणासाठी आपल्याला एक मशीदही शिल्लक रहाणार नाही.

३. तुम्ही वर्ष २०२० मध्ये जे काही करत आहात, त्यातून तुम्ही हिंदूंना ८०० वर्षांचे स्मरण करून देत आहात. त्यातून तुम्ही तुमच्या आतील विष दाखवत आहात.