रीवा (मध्यप्रदेश) येथे नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यावरून धर्मांध मुसलमानाकडून हिंदु तरुणाला मारहाण

बॅग, पैसे आणि भ्रमणभाष संचही हिरावून घेतले !

मारहाणीत घायाळ झालेले मुकेश तिवारी

रीवा (मध्यप्रदेश) – येथे सामाजिक माध्यमांतून नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याच्या प्रकरणी मुकेश तिवारी या तरुणाला धर्मांध मुसलमानाने घरी बोलावून मारहाण केल्याने तो गंभीररित्या घायाळ झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तिवारी यांचा भाऊ रा.स्व. संघाचा स्वयंसेवक आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

तिवारी कामावर जात असतांना त्यांच्या भावाचा मित्र असणार्‍या महंमद सुलेमान याने त्याला घरी बोलावले आणि घरामध्ये काठीने मारहाण केली. तसेच तो म्हणत होता, ‘नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ आणखी पोस्ट करशील का ?’ तसेच सुलेमान याने तिवारी यांची बॅग, पैसे आणि भ्रमणभाष संचही हिरावून घेतले.

संपादकीय भूमिका

नूपुर शर्मा प्रकरणावरून धर्मांधांनी आता धर्मयुद्ध पुकारून हिंदूंना लक्ष्य करणे चालू केले आहे, हे अशा प्रकारच्या घटनांतून प्रतिदिन लक्षात येत आहे. या घटनांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आता अपरिहार्य आहे !