मेरठ (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून कावडमध्ये थुंकल्याची घटना !

  • यात्रेकरूंनी एका धर्मांधाला पकडून चोपले !

  • यात्रेकरूंकडून रस्ता बंद आंदोलन

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील कंकरखेडामधील राष्ट्रीय महामार्ग ५८ वरील शिबिरात काही कावड यात्रेकरू विश्रांती घेत असतांना दोन धर्मांध मुसलमान तरुण दुचाकीवरून तेथे आले आणि ते कावडमध्ये थुंकले. ही घटना कावड यात्रेकरूंनी पाहिली. त्यांनी त्यातील एकाला पकडले, तर दुसरा पळून गेला. पकडलेल्या धर्मांधाला कावड यात्रेकरूंनी चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. यानंतर येथे कावड यात्रेकरूंनी रस्ता बंद आंदोलन केले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी कावड यात्रेकरूंना समजावले. तसेच ४ यात्रेकरूंना पुन्हा हरिद्वार येथे नेऊन गंगाजल भरून आणण्याचे आश्‍वासन दिले.

संपादकीय भूमिका

  • नूपुर शर्मा यांच्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारे मुसलमान, निधर्मीवादी, इस्लामी देश आणि त्यांची संघटना या घटनेविषयी का बोलत नाहीत ?  मुसलमानांना धार्मिक भावना आहेत आणि हिंदूंना नाहीत, असे त्यांना म्हणायचे आहे का ?
  • देशात ईश्‍वराची निंदा केल्याच्या प्रकरणात कठोर कायदा नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडूनही आरोपींना कठोर शिक्षा होत नाही. सरकार आतातरी याकडे गांभीर्याने पाहील, असेच हिंदूंना वाटते !