परात्पर गुरु डॉक्टर साधक आणि जिज्ञासू यांना साधनेसंदर्भात मार्गदर्शन करतात. ‘साधनेचे महत्त्व, ती का आणि कशी करायची ? त्यांचा स्वतःचा साधनाप्रवास आणि त्यासाठी विविध संतांनी केलेले साहाय्य’ यांविषयी ते मार्गदर्शन करतात. ही सूत्रे त्यांनी अनेक वेळा सांगितली आहेत; पण प्रत्येक वेळी ‘ती प्रथमच सांगत आहेत’, अशा प्रकारे ते सांगतात. साधकांवरील अथांग प्रीतीमुळे ते हे पुनःपुन्हा न कंटाळता आणि आनंदाने सांगत असतात. ‘साधक’ हेच त्यांचे केंद्रबिंदू आहेत. अनेक वर्षांपासून साधना करणार्या साधकांना परात्पर गुरु डॉक्टर तीच तीच सूत्रे, उदा. नियमित नामजपादी आध्यात्मिक उपाय पूर्ण करणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, त्याअंतर्गत स्वंयसूचनांची अभ्याससत्रे करणे इत्यादी सहस्रो वेळा सांगत असतात. साधक कित्येकदा हे सर्व करण्यास विसरतात, कंटाळा करतात किंवा परात्पर गुरु डॉक्टरांच्या अपेक्षेप्रमाणे साधनेचे प्रयत्न करत नाहीत, तरीही ते प्रेमाने त्याविषयी आपल्याला पुनः पुन्हा आठवण करून देतात. जोपर्यंत तो साधक शिकून अडचणींवर मात करत नाही, तोपर्यंत ते अत्यंत चिकाटीने आणि प्रेमाने पुनःपुन्हा मार्गदर्शन करत रहातात.’
– पू. देयान ग्लेश्चिच, युरोप.