पोलिसांकडून चौकशी
नवी देहली – सामाजिक माध्यमांतून इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचा ‘ट्रूथ अँड डेअर’ हा खेळ खेळतांनाचा व्हिडिओ सध्या प्रसारित होत आहे. यात विद्यार्थी चुंबन घेतांना दिसत आहेत. ज्या विद्यार्थ्यांने याचे चित्रीकरण केले आहे, त्या मुलाने पोलिसांना सांगितले, ‘त्याचे ११ मित्र त्यांच्याच वर्गातील २ मुलांनी भाड्याने घेतलेल्या सदनिकेवर ‘ट्रूथ एँड डेअर’ खेळत होते. या वेळी काही मुलांनी एका मुलीवर लैंगिक अत्याचार केले.’ या व्हिडिओमध्ये ३ मुलींसह ११ विद्यार्थी दिसत आहेत. जानेवारी मासामध्ये कर्नाटकातील मंगळुरू शहरात ही घटना घडली. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर महाविद्यालय प्रशासनानेच पोलिसांना याविषयीची माहिती दिली आणि या विद्यार्थ्यांवर कारवाई केली; मात्र अद्याप कुणीही पुढाकार घेतला नसल्याने याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला नाही. या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते का ? याचीही चौकशी चालू आहे.
#Liplock contest at private apartment in #Mangaluru, video goes viral; case against 8 students https://t.co/OkgyE3pjpR
— The Tribune (@thetribunechd) July 22, 2022
पोलिसांना शंका आहे की, द्वेषामुळे या मुलाने व्हिडिओ प्रसारित केला आहे. पोलिसांनी या सदनिकेच्या मालकाकडे चौकशी केली, तर त्यांनी सांगितले की,घरात दारुच्या बाटल्या सापडल्यानंतर त्यांच्या पालकांना माहिती देऊन या मुलांना २ मासांपूर्वीच तेथून हाकलण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकालहानपणापासून मुलांना साधना न शिकवल्याचा परिणाम ! अशी संस्कारहीन मुले पुढे जाऊन गुन्हेगार न बनल्यासच नवल ! पालकांनो, आतातरी मुलांना लहानपणापासूनच योग्य साधना करायला शिकवा ! |