पंजाबमधील सरकारी बसगाड्यांवरील खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे छायाचित्र काढण्याचा आदेश रहित !  

शिखांच्या धार्मिक संघटनांच्या विरोधाचा परिणाम !

चंडीगड – पंजाब सरकारच्या परिवहन विभागाच्या बस गाड्यांवर असणारे खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले आणि मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या हत्येतील दोषी जगतार सिंह हवारा यांची छायाचित्रे हटवण्याचा ६ जुलैला देण्यात आलेला आदेश रहित करण्यात आला आहे. शिखांनी या आदेशाला विरोध केल्यावर हा निर्णय घेण्यात आला. आदेश मागे न घेतल्यास हिंसक आंदोलन करण्याची धमकी देण्यात आली होती. दल खालसा, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटी, अकाली दल (अमृतसर) आणि अन्य संघटनांनी यास विरोध केला होता.

‘पेप्सू रस्ते परिवहन निगम’कडून म्हटले आहे की, छायाचित्रे हटवण्याच्या आदेशामुळे अनेक धार्मिक संस्थांकडून विरोध करण्यात येत आहे. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी आम्ही आदेश मागे घेत आहोत. (यात कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा काय संबंध ? दोघेही खलिस्तानी आतंकवादी आहेत. त्यांच्या छायाचित्रांचा संबंध धार्मिक भावनांशी कसा असू शकतो ? – संपादक)

संपादकीय भूमिका

पंजामबध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारचे राज्य कि खलिस्तानवादी धार्मिक संघटनांचे ? ही स्थिती पंजाबमध्ये पुन्हा एकदा फुटीरतावादी खलिस्तानी आतंकवादी कारवाया चालू होण्याचेच दर्शक आहे. याला आताच वेसण घातले नाही, तर पुढे काश्मीरप्रमाणे येथील स्थिती बिघडल्यास आश्‍चर्य वाटू नये !