श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे निवासस्थानातून पलायन !

  • सहस्रो नागरिकांचा राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर मोर्चा

  • नागरिकांकडून निवासस्थानात घुसखोरी

उजवीकडे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील नागरिकांनी येथील राष्ट्रपतींच्या निवासस्थानी प्रचंड मोठ्या संख्येने कूच केल्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी त्यांचे निवास सोडून पलायन केले. नागरिकांनी राजपक्षे यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजपक्षे यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या निवासस्थानी नागरिकांना तोडफोड करण्यापासून रोखण्यासाठी सैनिकांनी हवेत गोळीबार केला, तसेच  अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या वेळी पोलीस आणि नागरिक यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये २ पोलिसांसह काही जण घायाळ झाले. यानंतरही शेकडो नागरिकांनी राजपक्षे यांच्या निवासस्थानात प्रवेश केला. तेथे त्यांनी तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे.

श्रीलंकेतील अधिवक्त्यांची संघटना, मानवाधिकार संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या दबावामुळे पोलिसांनी सरकारविरोधी आंदोलने रोखण्यासाठी लागू केलेली संचारबंदी हटवली होती. त्यानंतर हे आंदोलन करण्यात आले.