बिलासपूर (छत्तीसगड) येथे फैजल आणि त्याच्या ८ साथीदारांकडून हिंदु भावांवर आक्रमण !

बहुसंख्य हिंदूंच्याच देशात हिंदू असुरक्षित !

बिलासपूर (छत्तीसगड) – बिलासपूर जिल्ह्यातील जयकुमार मिश्रा आणि ओमकुमार मिश्रा या दोघा भावांवर फैजल अन् अन्य ८ जणांनी ३ जुलैच्या सायंकाळी आक्रमण केले. या आक्रमणात दोघे भाऊ घायाळ झाले आहेत. या प्रकरणी फैजल आणि अन्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नसून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

जयकुमार यांनी नोंदवलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले की, तो आणि त्यांचा भाऊ हे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रहात असून गुरु घासीदास विश्‍वविद्यालयात शिकतात. दोघे भाऊ चालत बाजारात जात असतांना त्यांच्यावर फैजल आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकींवरून येऊन चाकूने आक्रमण केले. दोघांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या आक्रमणामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचे अन्वेषण करत आहेत.