दुर्गामाता प्रतिष्ठान, विहिंप आणि आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने वारीच्या निमित्ताने शिधा वाटप !

शिधा वाटप करताना कार्यकर्ते

इचलकरंजी, ५ जुलै (वार्ता.) – दुर्गामाता प्रतिष्ठान, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने पंढरपूर येथील आषाढी वारीच्या निमित्ताने शिधा वाटप करण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे श्री. पंढरीनाथ ठाणेकर, श्री. किशोर मोदी, श्री. संतोष हत्तीकर यांसह सर्वश्री दत्ता पाटील, अनिकेत तानुगडे, शांताराम बागडे यांसह अन्य उपस्थित होते.