हिंदूंसाठी मातेसमान असणार्‍या गायींचा ईदच्या वेळी बळी देऊ नका !

आसामचे खासदार बद्रुद्दीन अजमल यांचे मुसलमानांना आवाहन !

आसामचे खासदार बद्रुद्दीन अजमल

गौहत्ती (आसाम) – देशात बहुसंख्य लोक हे सनातन धर्मीय आहेत. त्यामुळे इस्लाम धर्माचे पालन करणार्‍यांनी ईदच्या दिवशी गायींचा बळी देऊन सनातन धर्मियांच्या भावना दुखवू नयेत. ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी गायीचा बळी देणे अनिवार्य नाही. देशातील बहुतांश बांधव हे सनातन किंवा हिंदु धर्मातील आहेत. ते गायीला मातेसमान मानतात. त्यामुळे मुसलमानांनी गायींचा बळी कशासाठी द्यायचा ? ईदला मुसलमानांनी गायींचा बळी देऊ नये, असे आवाहन अखिल भारतीय युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे अध्यक्ष आसाम राज्य जमीयत उलमाचे अध्यक्ष, तसेच खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी केले आहे.

अजमल पुढे म्हणाले की, इस्लाममध्ये, कीटक, कुत्रा किंवा मांजर यांना वेदना देण्यासही अनुमती नाही. कुणी मांजर किंवा कुत्रा यांना हानी पोचवत असेल, तर त्याला स्वर्गात स्थान मिळत नाही.

संपादकीय भूमिका

हे ईदच्या वेळीच का सांगावे लागते ? देशात प्रतिदिन सर्वत्र मुसलमान कसायांकडून गोहत्या केल्या जात असतांना त्या रोखण्यासाठी असे आवाहन देशातील सर्वच मुसलमान नेते, धार्मिक नेते का करत नाहीत ?