पत्रकार राणा अयुब यांचे ट्विटर खात्यावर बंदी

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात ट्वीट केल्याचे प्रकरण

नवी देहली – काशी येथील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरने पत्रकार राणा अयुब यांच्या ट्विटर खात्यावर बंदी घातली आहे.

भारत सरकारने राणा अयुब यांच्या खात्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती.

या कारवाईनंतर ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या मानवाधिकार संघटनेचे सरचिटणीस एजेन्स कॅलमार्ड यांनी म्हटले की, ही कारवाई लज्जास्पद आहे. राणा अयुब यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे.