कोलंबो – आर्थिक कंबरडे मोडलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या संसदेमध्ये सांगितले की, भारताकडून दिले गेलेले आर्थिक साहाय्य हे दान नसून श्रीलंकेला हे कर्ज फेडावे लागेल. त्यासाठी आपल्याकडे योजना आखावी लागेल. विक्रमसिंघे म्हणाले की, आम्ही भारताकडून ४ बिलियन अमेरिकी डॉलरचे (३१ सहस्र कोटी रुपयांहून अधिकचे) कर्ज घेतले आहे. आम्ही भारताकडे अधिक कर्ज देण्याचे आवाहनही केले आहे; परंतु भारत अधिक कर्ज देऊ शकणार नाही.