दिवाळखोर श्रीलंकेतील सरकारी कार्यालये आणि शाळा होणार बंद !

इंधन वाचवण्यासाठी घेतला निर्णय !

कोलंबो – आर्थिक डबघाईला गेलेल्या श्रीलंकेने पुढील आठवड्यापासून त्याची सरकारी कार्यालये, तसेच शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. इंधन वाचवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयात म्हटले आहे की, कोलंबो शहरातील सर्व सरकारी आणि सरकारी मान्यता असलेल्या खासगी शाळांतील शिक्षक मुलांचे ऑनलाइन वर्ग घेतील. श्रीलंकन सरकार आधीच गेल्या अनेक मासांपासून दिवसाला १३ घंट्यांपर्यंत वीजकपात करत आहे. श्रीलंकेवरील एकूण विदेशी कर्ज ५१ अब्ज डॉलर (जवळपास ४ लाख कोटी रुपये) आहे.