पैगंबर यांच्या कथित अवमानावरून आता इस्लामिक स्टेटकडूनही भारतावर आक्रमणाची धमकी

नवी देहली – इस्लामिक स्टेटच्या मुखपत्रातून भारतावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. नूपुर शर्मा यांचे पैगंबर यांच्या कथित अवमानाविषयी केलेल्या विधानावरून ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वी अल्-कायदाकडूनही अशाच प्रकारची धमकी देण्यात आलेली आहे.