योगी आदित्यनाथ यांच्याकडे संरक्षणाची मागणी
लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष तथा हिंदु धर्म स्वीकारलेले जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांना दाऊदच्या टोळीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दाऊद टोळीचा इकबाल कासकर याच्या भावाने ही धमकी दिल्याची माहिती त्यागी यांनी दिली. त्यागी म्हणाले की, कासकर याच्या भावाने १० जूनला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अनेकदा माझ्याशी भ्रमणभाषवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एकदा मी तो उचलल्यावर त्याने तो इकबाल कासकरचा भाऊ बोलत असल्याचे सांगत ‘मला ३ दिवसांत ठार मारणार’, अशी धमकी दिली.
Waseem Rizvi alias Jitendra Tyagi receiving death and beheading threat calls from Dubai and Pakistan numbers, urges UP CM to take actionhttps://t.co/ZFE4vJt7Kr
— OpIndia.com (@OpIndia_com) June 11, 2022
या घटनेनंतर त्यागी यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून संरक्षण देण्याची, तसेच धमकी देणार्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
संपादकीय भूमिकाहिंदूंना अशी धमकी देण्याचे आतंकवाद्यांचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भाजपने आतंकवाद्यांवर केली पाहिजे ! |