सुरक्षेसाठी जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षितस्थळी हलवले !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या रेहोबोथ बीचजवळील घरावरून एक छोटे विमान ४ जून या दिवशी विमानांना प्रवेश नसल्याचे भागामध्ये (‘नो-फ्लाय झोन’मध्ये) घुसले होते. या प्रकारानंतर सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी यांना सुरक्षितस्थळी हलवले. याविषयीची माहिती अमेरिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Biden evacuated after plane entered airspace near beach home https://t.co/hRCyOprIXd
— CNBC Politics (@CNBCPolitics) June 4, 2022
राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित असून हे आक्रमण नव्हते, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांना पुन्हा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले. आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !