काश्मीरमधील हिंदूंच्या हत्यांना पाकिस्तान उत्तरदायी ! – केंद्र सरकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेली उच्चस्तरीय बैठक

नवी देहली – काश्मीर खोर्‍यात सातत्याने होणार्‍या हिंदूंच्या हत्यांना पाकिस्तान उत्तरदायी असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले. आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये आरंभलेल्या हिंदूंच्या हत्यासत्राविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३ जून या दिवशी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली. या बैठकीस गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह आदी उपस्थित होते. ‘काश्मीरमधील हिंसाचाराची पातळी वाढली आहे; पण तो जिहाद नाही. (काश्मीरमध्ये वर्ष १९९० पासून केवळ हिंदूंना लक्ष्य करून त्यांना ठार मारले जात असून त्यांना पलायन करण्यास भाग पाडले जात आहे, हा जिहाद नाही, तर काय आहे ? जर  मुसलमानांना खुश करण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांकडून अशा प्रकारचे विचार मांडले जात असतील, तर तो हिंदूंचा विश्‍वासघात आहे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक) हिंसाचार करणारे सीमेपलीकडे पाकिस्तानात बसले आहेत’, असे सरकारच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. (जर हे ठाऊक आहे, तर पाकवर कारवाई का केली जात नाही ? कि पाकिस्तानने हिंदूंना ठार मारत जावे आणि आपण निष्क्रीय रहावे, असे सरकारी यंत्रणांना वाटते ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • यात सरकारने नवे काय सांगितले ? वर्ष १९९० पासून हे संपूर्ण जगालाच ठाऊक आहे. यावर सरकार काय करणार आहे आणि हिंदूंचे रक्षण कसे करणार आहे ?, हे त्यांनी सांगायला हवे !
  • काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी केवळ तेथील जिहादी आतंकवाद्यांना ठार मारणे पुरेसे नाही, तर त्यांचा निर्माता असलेल्या पाकिस्तानला नष्ट करण्याची आवश्यकता आहे. ते धाडस आता सरकारने दाखवावे !