मशिदीच्या जागेवर पूर्वी मंदिर असल्याच्या दाव्यांना मुसलमानांनी विरोध करावा ! – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची चिथावणी

बेंगळुरू – मशिदीच्या जागी पूर्वी मंदिर असल्याच्या दाव्यांना मुसलमानांनी विरोध करावा, अशी चिथावणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने त्याच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत दिली. या संदर्भात एक पत्र प्रसारित करण्यात आले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील शाही ईदगाह मशीद यांच्या विरोधात रा.स्व. संघ परिवाराच्या संघटनांच्या याचिका ‘धार्मिक स्थळ कायदा १९९१’च्या विरोधात आहेत. न्यायालयाने या याचिकांवर सुनावणी करू नये. सर्वाेच्च न्यायालयाने ज्ञानवापीतील वजूखान्याच्या (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) वापरावर बंदी घालणे निराशाजनक आहे. न्यायालयाला अशा प्रकारच्या (ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडल्याच्या) दाव्यांवर पुराव्यांच्या आधारे पडताळणी करण्याची आवश्यकता न भासता, त्यांनी ते ठिकाण बंद केले. यातून अशी प्रथा पडू शकते की, देशातील कुठेही कुणीही धार्मिक स्थळाविषयी अशा प्रकारचा दावा करू शकतो. (कुठेही नाही; मात्र जेथे हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी आणि दर्गे बांधण्यात आले, त्या ठिकाणी दावा केला जाणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘देशातील सहस्रो मंदिरे पाडून तेथे मशिदी, दर्गे बांधल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मुसलमान संघटनांनी आता पुढे येऊन ही स्थाने हिंदूंना सोपवून धर्मनिरपेक्षतेचा आदर्श जगापुढे सादर करावा’, असे आवाहन निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी संघटना करतील का ?
  • अशा चिथावणीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत नाही का ? समाजात वारंवार अशांतता निर्माण करणाऱ्या अशा संघटनांवर सरकारने बंदीच घातली पाहिजे !