कोल्हापूर येथे मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी हिंदूंची निदर्शने !

‘जय शिवाजी, जय श्रीराम, बांधकाम हटवा’ या घोषणांनी परिसर दुमदुमला !

कोल्हापूर, २५ मे (वार्ता.) – रामानंदमार्गावरील मशिदीचे अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे, यासाठी परिसरातील हिंदु नागरिकांनी २३ मे या दिवशी ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौकात निदर्शने केली. कोल्हापूर महापालिका कनिष्ठ अभियंता सुनील भाईत यांनी २६ मेपर्यंत या बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

शहरातील मध्यवर्ती हॉकी स्टेडियम रामानंदनगर मार्गावर रि.स.नं. ५९९/बी/३ प्लॉट क्रमांक ७ या खासगी जागेवर मशिदीचे अनधिकृत बांधकाम चालू आहे. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. यानंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने परिसरातील हिंदूंनी निदर्शने केली. ‘जय शिवाजी, जय श्रीराम, बांधकाम हटवा’, अशा घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या. या आंदोलनात म्हाडा वसाहत, पाडळकर वसाहत, बालाजी पार्क, शाहू कॉलनी येथील नागरिक, विविध मंडळांतील युवक सहभागी झाले होते.

संपादकीय भूमिका

  • अन्यत्रचे हिंदू यातून काही बोध घेतील का ?
  • प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी हिंदूंना निदर्शने करावी लागणे निषेधार्हच !