
कर्णावती (गुजरात) – भाजपने श्रीरामाच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा केले. या पैशांचा भाजपने कधी हिशोब दिला नाही. जेव्हा सरकारने अर्थसंकल्पात मंदिरासाठी पैशांची तरतूद केली, तेव्हा भाजपचे नेते-कार्यकर्ते श्रीराममंदिरासाठी पैसे गोळा करण्यासाठी निघाले. ज्या लोकांनी भक्तीभावाने श्रीराममंदिरासाठी विटा पाठवल्या होत्या, त्या लोकांना वाटले की, याद्वारे मंदिर बांधले जाईल; मात्र त्या विटांवर कुत्रे लघवी करतांना दिसत आहेत, असे विधान गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी यांनी केले. यावरून त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, माझे विधान श्रीरामाच्या विरोधात नव्हते आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचाही माझा उद्देश नव्हता. माझे नाव ‘भरत’ आहे आणि भरतानेही श्रीरामाचे मंदिर बांधले होते. माझा उद्देश ‘श्रीरामाच्या नावावर सत्तेवर आलेल्यांची विचारसरणी लोकांसमोर आणणे’, हा होता.
भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे ? – हार्दिक पटेल यांचा काँग्रेसला प्रश्न
काँग्रेस पक्ष जनतेच्या भावना दुखावण्याचे काम करतो, तसेच हिंदु धर्माच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न करतो. आज माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरातमधील काँग्रेसच्या नेत्याने ‘श्रीराममंदिराच्या विटांवर कुत्रे लघवी करतात’, असे विधान केले. मला काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना विचारायचे आहे की, भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे ? तुम्ही हिंदूंचा इतका द्वेष का करता ? अनेक शतकांनंतर अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर बांधले जात आहे, तरीही काँग्रेसचे नेते प्रभु श्रीरामाच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नुकतेच त्यागपत्र दिलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्वीट करून केली.
संपादकीय भूमिकाअसे विधान करून सोलंकी काय साध्य करू पहात आहेत ? नसानसांमध्ये हिंदुद्वेष भिनलेल्या काँग्रेसवाल्यांना हिंदू मतपेटीद्वारे संपवतील, हे लक्षात घ्या ! |
मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे ‘इनाम निर्मूलन विधेयक’ स्थगित करावे लागले
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक
Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !